Tuesday 9 October 2012

Ambe Maa 2012
बाल मित्र मंडळ, सुदाम नगर, काजूपाडा, बोरीवली पूर्व तर्फे सन १९७३ रोजी सार्वजनिक नवरात्र उत्सवाची स्थापना करण्यात आली. आज आपल्या संस्थेला ४० वर्षे होत आहेत. आम्ब्याखालची अथवा बाजारातली देवी अशी तिची सुरुवातीची ओळख होती. बाजारातील जागेच्या अडचणीमुळे कालांतराने देवीची स्थापना बद्री केदारनाथ मंदिरा समोरील गल्ली मध्ये होऊ लागली. गेल्या २० वर्षांपासून आता आंबे मातेची स्थापना त्याच ठिकाणी होत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून सध्या ती परिसरात ख्यातनाम झालेली आहे.

या उत्सवात दरवर्षी ६ ते ७ फुटाच्या देवीची मूर्तीची स्थापना केली जाते. दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने नवरात्री चा उत्सव साजरा केला जातो. समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक यात उत्साहाने सहभागी होतात. पहिल्या दिवशी भजन व इतर दिवशी रात्री संगीत गरब्याचे कार्यक्रम असतात. गेली १० वर्षे अष्टमीच्या दिवशी होम-हवन, महाप्रसाद व भंडारा चे आयोजन असते ज्याचा सुमारे चार ते पाच हजार लोक लाभ घेतात. रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई व चल चित्रांचे देखावे कार्यक्रमाची शोभा वाढवतात.


आंबा मातेच्या उत्सवासाठी समाजातील सर्व थरांचे योग्य ते सहकार्य आम्हास लाभते. परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग, राजकीय नेते, मंडळाचे लहान मोठे सभासद अश्या सगळ्यांच्या हातभारामुळेच नवरात्री चा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्यवस्थित रित्या पार पडतो. 

समाजातील सर्व लोकांसाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लहान मुलांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात जेणे करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळू शकेल. समाजातील गरजू व्यक्तींना योग्य ती मदत मंडळातर्फे केली जाते.


विजयादशमी च्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आंबा मातेची विसर्जन मिरवणूक निघते.

नवरात्र उत्सव शिवाय आपल्या मंडळातर्फे दहीहंडी (कृष्ण जन्मोत्सव), होळी, कोजागिरी पौर्णिमा देखील साजरी केली जाते.